Marathi Poem On Life थोड जगलं पाहिजे


आयुष्य थोडसच असावं 

आयुष्य थोडसच असावं पण आपल्या माणसाला ओढ 
लावणार असावं,
आयुष्य थोडंस जगावं पण जन्मोजन्मीच 
प्रेम मिळावं,
प्रेम असं द्याव की घेणाऱ्याची ओंजळ 
अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की स्वार्थाच नसावं,
आयुष्य असं जगावं की मृत्युनेही म्हणावं,

"जग अजून, मी येईन नंतर...........!!!!



*थोड जगलं पाहिजे.........!!*


आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फोटो असतात,
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात.
गजर तर रोजचाच आहे
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom & Jerry पाहिलं पाहिजे.
आंघोळ फक्त दहा मिनिटे?
एखाद्या दिवशी तास घ्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आलं पाहिजे.
भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचण सुध्दा जमलं पाहिजे.
धर्मग्रंथाचा रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
नैतीक मालिकेत नैतिकता थोरच
"बेवॉच" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.
कधी तरी एकटे
उगाचच फिरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.
संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
"फुलपाखराच्या" सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.
द्यायला कोणी नसलं
म्हणून काय झालं?
एक गजरा विकत घ्या
ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.
रात्री झोपताना मात्र
दोन मिनिटे आयबाला द्या,
एवढया सुंदर जगण्यासाठी
नुसतं थँक्स तरी म्हणा..!!






You might also like :